दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, ११ जुलै २०२३: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर भीषण रस्ता अपघात झाला आहे. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर एक स्कूल बस चुकीच्या दिशेने येत होती. त्यामुळेच त्यांची समोरून येणाऱ्या कारसोबत जोरदार धडक झाली. त्याचवेळी या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या ६ जणांचा मृत्यू झाला, तर आठ वर्षांच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशन परिसरात या घटनेची नोंद झाली आहे. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचलेले पोलीस मदतकार्यात गुंतले आहेत. लाल कुआंहून दिल्लीला जाणाऱ्या लेनवर अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केली आहे.

मेरठच्या मवाना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ८ जण कारमधून प्रवास करत होते. त्यांची दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे वरील विजय नगर उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या स्कूल बसला धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा