ठाणे २४ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे (ठाणे न्यूज) जिथे एका २२ वर्षीय मुलीचे तिच्या माजी प्रियकराने त्याच्या पाच मित्रांच्या मदतीने प्रथम अपहरण केले आणि नंतर त्यापैकी चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. भिवंडीतील शांतीनगर परिसरातील फातिमा नगरमध्ये गुरुवारी ही घटना घडली.
भिवंडी येथील एका गावात पिडीत २२ वर्षीय तरुणी राहते.पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी हे रिलेशनमध्ये होते. दोघेही एकाच गावातील आहेत. मागील काही वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते.चार महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तरुणी दुसऱ्या तरुणांसोबत रिलेशनशिपमध्ये गेली. हे कळल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला राग आला. त्यातूनच तिला धडा शिकवण्यासाठी आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा कट रचला.पीडितेच्या भवाचे पीडितेच्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी मिळून अपहरण केले दरम्यान पिडीत तरुणी २० फेब्रुवारी रोजी आत्याच्या घरी गेली होती.
तिथे ती झोपलेली असताना तिला अचानक जाग आली. तिने मोबाईल बघितला असता, तिला तिच्या भावाचे १५ मिसकाॅल दिसले. तिने भावाला लगेचच फोन केला असता, त्याने तब्येत बरी नसल्याचे सांगत तिला एका ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानुसार ती ओळखीच्या एका रिक्षामधून त्याठिकाणी गेली. त्यावेळी तिथे असलेल्या चौघांनी तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर पिडीतेला रिक्षामध्ये बसवून एका झाडाझुडपात नेले तिथे चौघांनी तिच्यावर . त्यानंतर त्यांनी तिला दुसऱ्या ठिकाणी नेले आणि तिथे एका टेम्पोमध्ये तिच्यावर पुन्हा सामुहिक अत्याचार केला. २० फेब्रुवारी रोजी रात्री १.३० ते पहाटे ६ या कालावधीत ही घटना घडली.
आरोपींनी पीडितेला संपूर्ण रात्र आपल्या वासनेचा बळी बनवले. त्यांनी नागावमधील एका शाळेजवळ आणि फातिमानगरमधील एका पिकअप व्हॅनमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडिता कशी तरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीचे कुटुंबिय तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. या प्रकरणात, प्रथम भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात शून्य एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतर हे प्रकरण शांती नगर पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोधही सुरू केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यासोबतच पीडितेचा आऊ आणि ऑटो चालकाचे जबाबही नोंदवण्यातआले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, ऋतुजा घनवट