सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, चिमुकलीचे हदय काढून खाल्ले

11

कानपूर, २१ नोव्हेंबर २०२०: मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. हाथरस, कोपर्डी, खैरलांजी, हिंगणघाट, हैद्राबाद आणि या सर्वांच्या आधी देखील झोपेतून जागी करणारी दिल्लीची निर्भया. पण, या सर्व घटनांमधे काही एक साम्य असेल तर ते म्हणजे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य. यानंतर देखील मानवता झोपलीच आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (काही आपवाद वगळता)

मुलींवर संस्कार नसल्यानेच बलात्कार होतात.मुलीने आपली पायरी ओळखून वागली तर असे कृत्य होत नाही. मुलींनी तोकडे कपडे घालू नये. इथे पर्यंत बोलले जातेच. म्हणजे तोकड्या कपड्यांवर नजर जाते पण स्वत:च्या तोकड्या विचारांवर नाही. वरील सर्व थोतांड हे कळत्या मुलींना समजेल एक वेळ पण त्यांचं काय जिचे वय पाच वर्षे, तीन वर्षे असेल त्या मुलीने काय केलं जे अश्या नराधमाच्या वासनेच्या बळी ठरल्या…..

काही दिवसांपूर्वीची हि घटना आहे पण, ह्रदय पिळवटल्या शिवाय आणि डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. रामराज्यात म्हणजे युपी मधे जिथे रोज गुन्हे घडतात पण तरी तिथे रामराज्य आहे. रामराज्य म्हणून ओळखल्या जाणा-या युपीच्या कानपूर जिल्ह्यातील घाटम गावात अंधश्रद्धेला बळी पडून एका दाम्पताने असे कृत्य केले ज्याला कोणतीही उपमा दिली तर समस्त मानवतेचा अपमान होईल.

या दाम्पत्याला मुलबाळ होत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या भाच्याला सांगून शेजारील सहा वर्षीय मुलीचे अपहरण केले. भाचा अंकुल याने मित्रांबरोबर चिमुकलीचे अपहरण तर केलेच पण त्यानंतर तिच्यावर सामुहिक गँगरेप केला आणि नंतर त्या चिमुरडीचा गळा चिरला. जीव गेल्या नंतर त्या नरधमाने तिचे शरीर फाडले व त्यातून ह्रदय, किडनी, आतड्या बाहेर काढून ते कापून तीचे ह्रदय त्याच्या काका काकूंना खायला दिले.

असे कृत्य तर एखाद्या राक्षसालाही लाजवेल. पण, अंधश्रद्धेला बळी पडून केलेल्या या कृत्याने मानवाची मानसिकता हि स्वत:च्या सुखासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते हे दिसून येत आहे.

प्रत्येक घटनेला न्याय देण्याचे काम हे भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात मिडिया करत असतो. पण आज घडीला या पेक्षाही गंभीर प्रश्न बहुतेक त्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे अश्या घटनांना जेव्हा एखादी राजकारणी व्यक्ती स्वत:च्या…..पोटी भेट देते तेव्हांच काय ते TRP मिळते आणि मग ती घटना आजच्या मिडियाला मोठी घटना वाटते तेव्हा कुठे तिची दखल काही वेळेसाठी का होईना घेतली जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव