सियाचीन: सियाचीन ही जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. शत्रूपेक्षाही येथे जवानांचा सामना वातावरणाशी असतो. हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होण्याचे प्रकार होत असून तेथील तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंतही जाते.
सियाचीनच्या उत्तरेकडील भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हिमस्खलन झाले असून, हे ठिकाण १८ हजार फूट उंचीवर आहे. डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यातील चार जवान आणि दोन हमालांचा मृत्यू झाला. सैनिकांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.