पांढरकवडा मध्ये कत्तलखान्यावर धाड , गो मास असण्याची संशय

यवतमाळ, १५ जून २०२० : पांढरकवडा शहरातील मोमिनाबाद कॉलनी मध्ये काल (दि.१४) रोजी सकाळी ११.०० वाजता पोलिसांनी धाड टाकून जनावरांच्या मासांसहित चार अरोपींना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळाहून ४५ किलो जनावरांचे मास ही मिळाले .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , पांढरकवडा शहरात नेहमीच जनावरांची कत्तल करून त्यांच्या मासाची खुलेआम विक्री केली जाते, मात्र अशा लोकांवर कोणतीही कडक करवाई करण्यात येत नसल्यामुळे या मास विक्रेत्यांची हिंम्मत वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर काल (दि.१४) रोजी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सचिन पारजवार व पांढरकवडा शहर गो रक्षक सचिन अन्नेरवार यांना मोमिनाबाद कॉलनी मध्ये गाय व बैलांची कत्तल करून त्यांच्या मासाची विक्री होत असल्याची बातमी समजली. तेंव्हा त्यांनी ती माहिती पांढरकवडा शहर पोलिसांना दिली.

सदर माहितीच्या आधारे API संगिता येकोंडे यांनी जमादार दुर्गालाल टेंभरे, पो. कॉ. सचिन मडकाम व इतर पोलिस कर्मचारी सह मोमिनाबाद कॉलनीतील कत्तलखान्यानर धाड टाकली. यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी उपस्थीत होते.

यावेळेस कत्तलखान्याचे मालक मो. नवाज, मो. सिराज कुरेशी वय वर्षे ३८ यास अटक करून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्याच्या कत्तलखान्यातील २/३ खोल्यात रक्त, मास व तीन गुरे बांधून ठेवल्याचे दिसून आले.

घटनास्थळावरील मांस हे गाय किंवा बैलाचे आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही परंतू बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते गो मांस असल्याचाच दावा केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मांस व व जनावरे जप्त करून आरोपी मो. कुरेशी, मो. मोहसिन, मो. सिराज कुरेशी, मो. अतिक, मो. रफिक कुरेशी, मो . नफिज, मो. अफिज कुरेशी यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कलम १८८, २६९, भा.द.वि. चे सह कलम ५(ब),(क), ९, ९ (अ) प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी :विक्की देशट्टीवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा