नवी दिल्ली, दि. २५ जुलै २०२० : भारतामधे कोरोनाने शिरकाव केला आणि आणि भारताच्या लोंकांनी आपल्या अर्थानुसार, घरगुती उपाय करत यावर उपचार काढले. सुरवातीला तर काही हुशार लोकांनी गोमुत्र आणि शेण पार्टीचे आयोजन केले तर मग कुठे कोरोना मय्या ची पुजा करुन कोरोनाला घालविण्याचे मुर्ख आणि केविलवाणे प्रयत्न करण्यात आले. तर गो कोरोना गो अशा घोषणा देखील देण्यात आल्या. तर भारतातील प्रसार माध्यामांनी भांडवलशाहीच्या कोरोनिलचा प्रचार केले. मात्र या सर्व उपाय योजनेपुढे कोरोना भारतातून हद्दपार तर झालाच नाही उलट भारताला जागतिक क्रमवारीत ३ -या स्थानी घेऊन गेला.
या सर्व उचापाती नंतर देखील भारतात आता आणखी एक उपाय शोधण्यात आला आणि तो म्हणजे “भाभी जी पापड” बरोबर वाचलत “भाभी जी पापड” खाओ कोरोना भगावो अशी घोषणाच आत्मनिर्भर सरकारच्या नेत्यानें अर्थात मोदी सरकारमधील मंत्री आणि बिकानेरचे भाजपा खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी केली आहे. मेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले आहेत. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते, पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक हऊन जाईल, असा दावा करत आहेत.
मेेघवाल यांच्या हस्ते एका खासगी कंपनीचा पापड लॉन्च करण्यात आला होता. त्या निमित्ताने एका व्हिडिओत या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज डेव्हलप होतील, असा दावा मेघवाल यांनी केल्याचे दिसत आहे. एवढेच नाही, तर “आत्मानिर्भर भारता अंतर्गत एका उद्योजकाने ‘भाभी जी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत. हे कोरोना व्हायरसचा सामना करण्यात अत्यंत उपयोगी ठरतील. त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला आशा आहे, की ते यशस्वी होतील, असेही मेघवाल यांनी पुढे वक्तव्य केले. पापड तयार करणारी ही कंपनी बिकानारमधील असून या कंपनीने दावा केला आहे की या पापडात गिलोय आणि इम्युनिटी वाढवणारी सामग्री टाकण्यात आली आहे.
तर या प्रकरणावर सोशल मिडियावर मंत्री मेघवाल आणि कंपनीची जोरदार खिल्ली उडवली जात असून भारतातील अशा कृत्यांमुळे जागतिक पातळीवर भारताचे हसे तर होत नाही ना असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी