पुणे, २६ ऑक्टोबर २०२२: राज्यात १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सूरु झाला असून, आतापर्यत १८ कारखाने सुरु झाले आहेत. परतीच्या पावसाने राज्यात जोरदार धुमाकूळ घातल्याने आणि ऊसतोड मजूर पण दिवाळीनंतरच मोठ्या संख्येने उपलध्द होणार असल्यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिवाळीनंतरच गाळप हंगाम सूरु करा असे सांगितले होते.
परतीचा पाऊस जोरदार झाल्यामुळे ऊसाच्या फडात चिखल असतो. शिवाय ऊसतोड मजुरांकडून तोडणी केली तरीही ऊसाच्या फडातून ऊस बाहेर काढतांना वाहने चिखलात अडकून बसतात. त्यामुळे अद्यापही राज्यात नऊ सहकारी आणि नऊ खाजगी, असे एकूण अठरा कारखाने सुरु झाले आहेत.
यंदा हंगाम उशीराने सूरु झाल्याने मजूर दिवाळी घरी साजरी करुन कारखान्यावर येणार आहेत. अशा मजुरांची संख्या जास्त असणार आहे. पाडवा झाल्यानंतर एक दोन दिवसात मोठ्या संख्येने मजूर दाखल होतील. आणि ऊसाच्या गळीत हंगामाला जोरदार गती येईल. अशी माहीती कारखानदारांनी व्यक्त केली आहे.
-harvesting-season-begins-slowly-18-mills-started-maharshtra-shekhar-gaikwad-pune-print-news-tmb-01-3215692/ via @https://twitter.com/l
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर