सोलापूर, दि. २९ ऑगस्ट २०२०: भीमा खोऱ्यातील घाटमाथ्यावर पाऊस थांबल्याने उजनीची मागील पाच दिवसांपूर्वीची वाटचाल जशी रोज दहा टक्क्यांनी वाढत होती ती गुरुवारपासून संथ गतीने सुरू आहे. ८९ टक्के पर्यंत टक्केवारी होत असताना आवक १५ हजार क्युसेक वर गेली होती. परंतु, पाऊस बंद झाल्याने उजणीकडे येणारे पाणी पूर्णतः बंद होत चालले आहे.
धरण १००% भरण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु, सर्वांना आता वात पहावी लागणार आहे. उजनी सारखे बलाढ्य धरण भरल्याने पुणे, सोलापुरसह नगर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राला मोठी ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.
चालू वर्षी भीमा खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण ऑगस्ट महिना धरण भरण्यासाठी लागला. गतवर्षी अवघ्या पंधरा दिवसात उजनी धरण भरले होते. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडल्याने कालवा, नदी, उपसा सिंचन योजनांना पाण्याची मागणी नसल्याने धरण भरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कारण, मागणी नसल्याने धरणातील पाणी साठा वाढत आहे.
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी: ४९६.४५० मीटर
एकूण पाणी साठा: ३२०४.०९ दलघमी
(११३.१४ टीएमसी)
उपयुक्त पाणी साठा: १४०१.२८ दलघमी
(४९.४८ टीएमसी)
टक्केवारी: ९३%
विसर्ग:
दौंडमधून- ४९८.११० क्यूसेक
बंडगार्डन- ७००० क्यूसेक
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील