स्नेहा विहार ते डेक्कन थेट बससेवा सुरू; विद्यार्थिनी आणि रहिवाशांना मोठा दिलासा!

शिवणे परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी!
स्नेहा विहार सोसायटी (दांगट पाटील नगर) येथून थेट डेक्कन जिमखानापर्यंत बससेवा सुरू झाली आहे. या सेवेचा सर्वाधिक फायदा महिला आश्रम, एस. एन. डी. टी. कॉलेज आणि गरवारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसह स्थानिक रहिवाशांना होणार आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल दिगंबर दांगट यांनी २२ ऑगस्ट रोजी पीएमपीएलकडे या थेट बससेवेची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएल प्रशासनाने तात्काळ हा निर्णय घेत नागरिकांच्या सोयीसाठी नवी सेवा सुरू केली.

या बससेवेमुळे दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होणार असून नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. उद्घाटनानंतर परिसरातील रहिवाशांनी पीएमपीएलच्या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे