पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७९,२२० जणांना मिळाली कोरोनाची लस

12

पुणे, ११ एप्रिल २०२१: पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून अनेक लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण प्रक्रिया मंदावली होती. पिंपरी-चिंचवड मध्ये देखील अनेक लसीकरण केंद्रे शुक्रवारी बंद राहिली. या पार्श्वभूमीवर पुण्यात सलग तीन दिवस लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात शुक्रवारी १ लाख, शनिवारी १.२० आणि आज देखील लस मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ७९,२२० जणांना कोरोना ची लस देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ५३० लसीकरण सत्रे झाली आहेत. त्यात कोव्हॅक्सिन ची ३५ आणि कोव्हीशिल्ड ची ४९५ सत्रे झाली आहेत. यानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यात ७९,२२० जणांना कोरोना ची लस देण्यात आली आहे. यातील पुणे ग्रामीण भागात कोव्हॅक्सिन ची ३८०२ आणि कोव्हीशिल्ड ची ४७, १२९ डोस देण्यात आले आहेत.

पुणे शहरात एकूण १३५ सत्रे झाली असून कोव्हॅक्सिन चे १ कोव्हॅक्सिन ची १३४ सूत्रे झाली आहेत. यात कोव्हॅक्सिन ची ४ आणि कोव्हीशिल्ड चे १३,७७२ डोस देण्यात आले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोव्हॅक्सिन चे ० आणि कोव्हीशिल्ड चे ७८ सत्रे झाली आहेत. ज्यात १४,५१३ लस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे पुणे जिल्ह्यात एकूण ७९,२२० जणांना कोरोना ची लस देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे