चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १२,२०५ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा टप्पा पार

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ (२२ मार्च २०२१ पर्यंत) मध्ये १२,२०५.२५ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दररोज ३४ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम केले जाते. २०१४-१५ मध्ये झालेल्या दररोज सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या बांधकामाच्या तुलनेत हे जवळपास तीन पट अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या (११,००० किमी) लक्ष्यापेक्षा हे १,२०५ किलोमीटरनी जास्त आहे.

ही कामगिरी महत्त्वपूर्ण आहे कारण कोविड-१९ साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावल्यामुळे चालू आर्थिक वर्षाचे पहिले काही महिने सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होते.

यावर्षी १ मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी निर्धारित कालावधीपेक्षा एक महिना आधी राष्ट्रीय महामार्गातील ११,००० किमी लांबीचे उद्दीष्ट साध्य करण्याचे जाहीर केले होते .

गेल्या काही वर्षांत देशातील महामार्ग बांधकामाची गती वाढविण्यासाठी मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा