तर मी खासदारकीचाही राजीनामा देईन, अमोल कोल्हे यांची भूमिका

3

मुंबई, ४ जुलै २०२३: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरू आहे. राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीच्या ३० आमदारांसह खासदार अमोल कोल्हेही दिसून आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी भूमिका बदलली आणि आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केले. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार यांच्याशी एका विषयावर भेटायला गेलो होतो. आणि तिथून मी शपथविधी सोहळ्याला गेलो. त्यावेळी मला अजिबात कळले नाही की, आजच शपथविधी होणार आहे. मी तिथे लगेच पोहोचलो. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, सर्वप्रथम माझा प्रश्न होता की, ही लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे? कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, पण धोरणाच्या विरोधात उभे राहून बोलणे गरजेचे आहे.माझ्याकडे काय झाले? याचे उत्तर नव्हते. मी स्वतःला विचारले की, मला सामील व्हायचे आहे का?

यावर अमोल कोल्हे म्हणाले, अनेक ठिकाणी आमदार फोडून सरकार बनवली. पण आपण आपली ध्येयधोरणे सोडून जर एखादी गोष्ट करत असू, तर मी खासदारकीचा राजीनामा देईल. त्यावर विचार व्हायला हवा. यामुळे लोकांचा लोकशाही वरील विश्वास उडेल. मी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्यामुळे मी माझ्या धोरणांवर ठाम राहणे हे माझे कर्तव्य आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून मला शरद पवारांनी लोकसभेसाठी संधी दिली. आणि या मतदारसंघातील मायबाप जनतेने मला मतदान केले. त्यांच्या विश्वासास पात्र राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा