…तर पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर सोडावं लागंल, भारताचं पाकिस्तानला प्रत्युत्तर

जिनेव्हा, २६ सप्टेंबर २०२० : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सभागृहात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेय. शनिवारी राईट टू रिप्लायमध्ये इंडिया मिशनचे पहिले सचिव मिजितो विनितो म्हणाले, ‘या हॉलमध्ये अशी एक व्यक्ती (इम्रान खान) आहे जीच्याकडे स्वतःची एकही उपलब्धी नाही, जीच्याकडे बोलण्यासाठी स्वतःचं असं काहीच नाही तसंच जगाला देण्यासारखं देखील काही.’

भारताच्या वतीनं पाकिस्तानला उत्तर देताना मिजितो विनितो म्हणाले की कश्मीर मुद्द्यावर आता फक्त पीओकेची चर्चा शिल्लक राहिले आहे आणि पाकिस्तानला आता पीओके रिकामा करावा लागेल. ते म्हणाले की, इम्रान खान यांनी स्वत: पाकिस्तानच्या संसदेत ओसामा बिन लादेनला “शहीद” म्हणून घोषित केलं होतं.

इतकंच नव्हे तर पाकिस्तानी पंतप्रधानांनी २०१९ मध्ये अमेरिकेत कबूल केलं होतं की, ३० ते ४० हजार दहशतवाद्यांना त्यांच्या देशात प्रशिक्षण दिलं जातं. मग त्याच दहशतवाद्यांना भारत (विशेषत: जम्मू-काश्मीर) आणि अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी पाठवण्यात आलं. हिंदू, ख्रिश्चन आणि शीख तसेच पाकिस्तानमधील इतर धार्मिक, वांशिक गटातील लोकांना जबरदस्तीने धर्मांतरित करून लक्ष्य केलं आहे, असं मिजितो विनितो यांनी म्हटलं

भारतीय प्रतिनिधीनी सोडलं सभागृह

शुक्रवारी यूएनजीएमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक हल्ले केले. इम्रान खान यांनी भाषण सुरू करताच भारतीय प्रतिनिधींनी सभागृह सोडलं.

आज संध्याकाळी संबोधित करतील पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाच्या महासभेला संबोधित करतील. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात दहशतीचे मुद्दे मांडले जातील. पंतप्रधानांचे लक्ष कोरोना विषाणूच्या साथीवरही राहू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा