….म्हणून बीएमडब्ल्यू कारचा वापर केला कचरा उचलण्यासाठी

रांची, २४ नोव्हेंबर २०२०: बिहारमधील रांचीमध्ये एक आश्चर्यचकित करणारं दृश्य पाहण्यास मिळालंय. इथं एक माणूस आपल्या लक्झरी कार बीएमडब्ल्यूमधून रस्त्यावर पडलेला कचरा वाहून आणताना दिसत आहे. आपल्या स्वप्नातल्या गाडीत कचरा उचलणारा रांचीचा तरुण प्रिन्स श्रीवास्तव ला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं.

वास्तविक, प्रिन्स श्रीवास्तव यांनी आपल्या वडिलांना भेटवस्तू देण्यासाठी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. पण, कार खरेदी केल्यानंतर त्यांच्या कारमध्ये सातत्यानं काही ना काही अडचणी येत होत्या. बीएमडब्ल्यू सेवा केंद्रात गेल्यानंतरही ही महागड्या लक्झरी कार दुरुस्त झाली नाही. ज्यामुळं प्रिन्स खूप अस्वस्थ झाला होता.

यावेळी प्रिन्सला आपली बीएमडब्ल्यू कार दुरुस्त करण्यासाठी बराच खर्च करावा लागला. इतकंच नाही तर प्रिन्स कार वर्कशॉप मालकाच्या वर्तनामुळं देखील संतापला होता. हा सर्व होणारा त्रास पाहता त्यांनी आपलीच एक दुसरी बीएमडब्ल्यू कार चक्क कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी वापरली.

प्रिन्स श्रीवास्तव म्हणतात की, लवकरच त्यांची समस्या सुटली नाही तर २९ नोव्हेंबरला ते सर्वांसोबत मिळून बीएमडब्ल्यू कारच्या सहाय्यानं कचऱ्याची वाहतूक करतील. प्रिन्स लवकरच या प्रकरणासाठी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा