राजगुरूनगर (खेड), दि. १९ जून २०२०: कोरोना च्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभ व इतर कार्यक्रमा साठी पुणे जिल्हा अधिकारी यांनी ५० नागरिकांनसह कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली असताना खेड तालुक्यामधील राजगुरूनगर येथील राजगुरू सहकारी बँकेच्या टिळक चौक शाखेच्या वास्तू नुतनीकरण मध्ये चक्क सोशल डिस्टेंस चा फज्जा उडवत कार्यक्रम करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी चेहऱ्यावर मास्क चा वापरही केलेला नसल्याचे दिसून येत आहे, मोठ्या संख्येने गर्दीत लोक व बँकेचे संचालक, कर्मचारी या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित होते.
खेड तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना अशा प्रकारे गर्दी करणे कितपत योग्य आहे, राजगुरूनगर नगर परिषदेच्या च्या हाकेच्या अंतरावर हा कार्यक्रम पार पडला, मात्र नगरपरिषद फक्त बघ्याची भूमिका घेत असून कार्यक्रम घेण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयातुन फक्त ५० लोकांमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी पत्र बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. तरीही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कार्यक्रमा साठी कोणतेही आदेश न पाळता ५० पेक्षा जास्त लोक त्यात सोशल डिस्टेंस न पाळता बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या.
संख्येची मर्यादा आणि सोशल डिस्टेंस न पाळता कार्यक्रम केल्याने प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे, असे कार्यक्रम जर होत राहिले तर खेड तालुक्यातून कोरोना हद्दपार करणार कसा असा ही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनिल थिगळे