नाशिक येथे मद्य प्रेमींकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

3

नाशिक, दि.४ मे २०२० : नाशिक जिल्हा रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यातच आजपासून दारू दुकाने उघडण्यात येणार असल्याने सकाळपासूनच मद्य प्रेमींनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अखेर दुपारी १ च्या सुमारास शहरातील सर्वच वाइन शॉप खुले झाल्याने एकच गर्दी केली आहे.

नाशिक शहरात सर्वच ठिकाणी दारू दुकाने खुली झाल्याने मद्यप्रेमींची तुंबळ गर्दी झाली होती. दीड महिन्यानंतर दारूची दुकाने खुली होणार असल्याचे ऐकताच मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण होते . मे महिन्याच्या भर उन्हात दारू शौकीन दारूसाठी उभे आहे. मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या आदेशाची पायमल्ली सर्वच ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सचा तर पूर्णपणे फज्जा उडाला आहे.

दारूपासून मिळणाऱ्या महसुलातून आर्थिक परिस्थिती खरंच सुधारणार आहे का ? आणि तसे असेल तर जीवापेक्षा महसूल महत्त्वाचा का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. भाजीपाला, दूध, मेडिकल, किराणा यांसारख्या अत्यावश्यक सेवेत दारू दुकान खरच समाविष्ट होतो का हासुद्धा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

….तर जबाबदार कोण?

नाशिकचा रेड झोन मध्ये समावेश असला तरीही आजपासून दारू दुकाने सुरु करण्यास परवानगी आलेली आहे. सकाळपासून मद्य प्रेमींनी रांगा लावल्या असल्या तरीही दुकान उघडताच सोशल डिस्टंन्सचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे शिवाय शासनच्या आदेशाची पायमल्ली दुकानदारांकडून सुद्धा झालेली आहे. येत्या काळात नाशिक शहराची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याला जबाबदार कोण ? हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरित आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा