गोल पोस्ट इतर शुभेच्छा सोशल डिस्टंसिंग पाळत पार पडला आदर्श विवाह सोहळा

सोशल डिस्टंसिंग पाळत पार पडला आदर्श विवाह सोहळा

बुलढाणा, दि.२४ मे २०२० : कोरोना विषाणूमुळे अख्या जगावर मोठे संकट ओढवले आहे. या विषाणूने अनेकांच्या हातचा घास हिरावला तर अनेक हातांना बेरोजगारही केले आहे. तसेच अनेकांच्या मुहूर्तावर पाणीही फिरवलं मात्र या अशा परिस्थितीतही काही विवाह होत आहेत व यातीलच काही विवाह समाजासमोर आदर्शही ठेवून जात आहेत.

सुरेश ठाकरे यांचा मुलगा नितेश राहणार सुजातपूर ता. खामगाव हल्ली मुकाम सुटाळा खुर्द व उद्धव सुलताने यांची मुलगी पूजा राहणार बेलुरा माटरगाव ता. शेगाव हल्ली मुकाम जळगाव खांदेश यांचा विवाह सोहळा शनिवारी दि.२३ मे रोजी कुऱ्हा काकोडा मुक्ताईनगर येथे २० पाहुण्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टंसिंग पाळत तसेच या वधू व वराने मास्क लावूनच विवाहाच्या ठिकाणी प्रवेश केला, अश्या प्रकारे हा विवाह सोहळा पार पडला.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version