आज काल सोशल मिडियामुळे जग खूप जवळ आले आहे, अस आता सगळ्यांनाच वाटत आहे. कारण सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मग ती चांगली असो की वाईट
सध्या मुलांच्या शाळांविषयीची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली व पालकांना विचार करायला भाग पाडणारीा आहे. ही पोस्ट भावनिक तर आहेच पण वास्तव परिस्थितीची जाणिव सुध्दा करून देत आहे. शाळा नक्की सुरू करा पण खालील एका तरी प्रश्नांचे उत्तर द्या. उत्तर हे वास्तव परिस्थितीशी जुळणारे असावे अशी अपेक्षा या प्रश्नांची आहे. तरच १५ जुननंतर बिनधास्तपणे शाळा, महाविद्यालय सुरू करा.असे एकूण १९ प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर पालकाने विचारलेले प्रश्न पाहू ….
◆ कोरोनावर खात्रीशीर औषध सापडले आहे का ?
◆ लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का ?
◆ प्रत्येक बेंचवर एक विद्यार्धी बसवाल…पण सध्या एका बेंचवर तीन-तीन विद्यार्धी दाटीवाटीने बसविले जातात..त्या पटसंख्येच्या तुलनेत..जास्त बेंच व खोल्या लागतील…त्या कशा उपलब्ध करणार ?
◆ शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार ?
◆ मधल्या सुट्टीत टाँयलेट मध्ये गर्दी होते त्याच्या नियोजनाचे काय ?
◆ जिथे शहाणी माणसे ऐकत नाहीत…तिथे लहान मुले ऐकतील का ?
◆ मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय हे सांगता येते.परंतु लहान मुले सांगु शकतील का ?
◆ सर्व व्यवस्थित आहे हे दाखविण्यासाठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?
◆ या तीन महिन्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळून पाहिलेले आहे…तरी ते मुलांना शाळेत पाठवतील का ?
◆ प्रत्येक मुलांकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?
◆ पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?
◆ शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का ? नंतर हात झटकून जबाबदारी टाळतील का ?
◆ लहान मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा.. लोकसभा व विधानसभा चालू करुन कोरोना संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणं जास्त योग्य? हि राजकीय टोलेबाजी नाही का ?
◆ स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील ?
◆ उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला वायरसची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करावे लागेल का? शिक्षकांना ही करावे लागेल का?
◆ क्वारंटाइन करण्यासाठी आपल्या मुलाला / मुलीला एकटं सोडण्यास पालक तयारी होतील का?
◆ बहुतेक पालकांना अलीकडे १ किंवा २ अपत्ये आहेत ,जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार ?
◆ शिक्षण महत्त्वाचे की मुले ? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?
◆ मुलांवर प्रयोग करुन पहायला ते काय माकडे किंवा उंदीर आहेत ?
वरील सर्व प्रश्न वाचल्यानंतर पालक भावनिक झाल्याशिवाय राहत नाहीत. वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो म्हणून येत नाही. प्रत्येक प्रश्न समाजाला वास्तव परिस्थितीची जाणिव करून देतो.
पालक किंवा संपुर्ण कुटुंबातील सदस्य हे लहान मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी, कामधंदा करत असतात. संपूर्ण आयुष्य हे मुलांसाठी घालवत असतात. मुले सुरक्षित राहिली पाहिजेत. त्यांच्या विकासात अडथळे आले नाही पाहिजेत हीच अपेक्षा असते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, वर्ष वाया जाऊ नये म्हणून ते चिंता करत असतात. ही चिंता काही प्रमाणात शाळा प्रशासन व राजकीय चर्चा यांच्यामुळे धोकादायक ठरू शकते.
खरंच वरील प्रश्न विचारात घेतले तर शाळांकडे अतिरिक्त वर्ग खोल्या आहेत का? एका बेंचवर एक मुलगा बसवला तर वर्गात मुलांना जागा मिळेल का? दोन मुलांमध्ये तीन फूट अंतर राखले तर इतर मुलांना कोठे बसवणार? याचे उत्तर सापडत नाही.
सरकारने लहान मुलांना धोक्यात टाकण्यापेक्षा एक वर्ष सर्वांना पास करावं किंवा पुढील वर्गात प्रवेश द्यावेत. शेवटी गुणपत्रिका व नियम संपूर्ण देशात समान असतील. यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही व लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. पण जर शाळा सुरू केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढला तर परिस्थिती गंभीर होईल. समाज व सरकार यांच्यातील संघर्ष अटळ आहे . सत्ता रूढ सरकारला या निर्णयामुळे राजकीय नुकसान सहन करावे लागेल. पण देशाच्या भविष्याच्या जीवाशी खेळून देश समाज वाचवायचा की आपली सत्ता व सरकार हे जे निर्णय घेणार आहेत त्यांनीच ठरवावे………!
उत्तराच्या प्रतिक्षेत………???
न्यूज अनकट प्रतिनिधी