गोल पोस्ट राजकारण सोशल मीडियावर खासदार सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज

सोशल मीडियावर खासदार सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज

पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातही महाविकासआघाडीच्या निर्मितीत सुळेंनी महत्वाची भूमिका बजावली. अनेक चढ उत्तरामध्ये त्या आपले वडील शरद पवार यांच्यासह खंबीरपणे उभे राहणे असो की माध्यमांशी निर्भिडपणे बोलणे असो. त्या कायमच पुढे राहिल्या. पण आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका निवांत क्षणीचे त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत.

सुप्रिया सुळेंनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्या चक्क कपूर फॅमिलीसोबत दिसत आहेत. आता तुम्ही विचार कराल की सुळे आणि कपूर एकत्र कसे काय.
तर ऋषी कपूर यांची बहिण रिमा जैन या सुप्रिया सुळेंची चांगली मैत्रीण आहेत. रिमा यांचा मुलगा व अभिनेता अरमान जैन याचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे दोघेही उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version