सोलापूर मध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात, ५ वारकरी ठार

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला जवळा वारकऱ्यांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. मंडोळी, हंगरगा या इतर गावांतील वारकऱ्यांना घेऊन हा टेम्पो पंढरपूरच्या दिशेने चालला होता. या अपघातात मडोळी आणि हंगरगा या गावातील ५ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विटांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक बसल्याचे सांगितले जात आहे. ही दोन्ही गावे बेळगाव मध्ये येतात.
सकाळी चार वाजता हा अपघात झाला असल्याचे समजले आहे. वारकऱ्यांनी हा टेम्पो भाड्याने घेतला होता. पहाटे चारच्या सुमारास विटा वाहून नेत असणाऱ्या एका टेम्पो ने वारकऱ्यांचा टेम्पोला मागून धडक दिली. मांडोळे गावातील चार वारकरी व हंगरगा गावातील एक वारकरी मृत्युमुखी पडले आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा