सोलापूर महापालिका उभारणार विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळा

सोलापूर, दि.१ जून २०२० : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका विषाणू संशोधन व निदान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी पदभरती करण्यात येत आहे.

सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच संशयितांचे स्वॅब तपासणीसाठीचे अहवाल पुण्यालाही पाठवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातच हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळात केवळ करोनाचीच नव्हेतर भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही ही विषाणूच्या संसर्गाचे संशोधन व निदान केले जाणार आहे. त्याच धर्तीवर सोलापूर महापालिकेचे हे केंद्र असणार आहे.

कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबचे निदान त्वरीत व्हावे, यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रयोगशाळा शासकीय रुग्णालयातच ठेवायची की स्वतंत्र ठिकाणी याचा निर्णय अद्याप झाला नाही.

प्रयोगशाळेसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री शासनामार्फत उपलब्ध होणार असून, संशोधक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेमार्फत केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा