सोलापूर, दि.१३ जून २०२० : सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम या कांही दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाल्या होत्या. शुक्रवारी (दि.१२) रोजी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली होती. त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा वाढतोच आहे. त्यामध्ये कर्तव्य बजावत असताना महापौरांना ही कोरोनाची लागण झाली. मात्र, आता महापौर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सोलापूरमधील यशोधरा हॉस्पिटल मधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं. २ जूनला सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलगा ही कोरोनाबाधित झाले होते . आता ते तिघेही यातून बरे बाहेर पडले आहेत.
दरम्यान, लोकांमध्ये वावरणे मनपाच्या बैठकांना उपस्थिती लावणे यामुळे सोलापूर मनपातील नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता महापौर दहा दिवसानानंतर कोरोनावर विजय मिळवून ब-या होवून आल्यामुळे पुन्हा सर्वजण नव्या जोमाने कामाला लगतील असा विश्वास आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: