सोलापूरला मिळाली आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्राची मान्यता

सोलापूर, दि. ११ जून २०२०: नुकतेच केंद्र सरकारने सोलापूरला एक्सपोर्ट सेंटर (आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्र) म्हणून मान्यता दिली आहे. सोलापूर साठी ही एक मोठी बातमी मानली जात आहे कारण सोलापूरला निर्यात केंद्र म्हणून दर्जा मिळाल्यानंतर येथील व्यापाऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे. सोलापूर मधील उत्पादित उत्पादनांना बाहेरील देशांमध्ये निर्यात करण्यासाठी येथील स्थानिक व्यापाऱ्यांना ही एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या विनंतीवरून केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोलापूरला एक्सपोर्ट (आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्र) सेंटर म्हणून मान्यता दिली.

नुकतेच केंद्र सरकारच्या
दुस-या टर्मच्या सत्तेची वर्षपूर्ती झाली. या वर्षपूर्ती निमित्त ३ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूरला आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्राची मान्यता मिळावी म्हणून केंद्र सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी या आधी सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे खासदार म्हणून वेळोवेळी संसदेमध्ये सोलापूरच्या समस्या मांडल्या आहेत . या माध्यमातून त्यांनी सोलापूरला नेहमीच मुख्य प्रवाहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. सोलापूर मधील विमानतळ, विद्यापीठाअंतर्गत होत असलेल्या क्रीडा स्पर्धा, महामार्ग व तसेच जिल्ह्यातील कांदा उत्पादन संबंधी समस्या यांच्याविषयी ते नेहमीच आवाज उठवत राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा