फलटण, सातारा २० ऑगस्ट २०२३ : लडाख दुर्घटनेत राजाळे, ता.फलटण (मूळ गाव हिंगणगाव) येथील जवान वैभव संपतराव भोईटे शहीद झाले. त्यांच्या निधनाने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात आई बेबीताई, वडील संपतराव तसेच लहान भाऊ विशाल, पत्नी प्रणाली, दीड वर्षांची मुलगी हिंदवी, दोन चुलते मोहन व विलास, दोन विवाहित बहिणी प्रिया नीलम असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबातील जवान वैभव भोईटे हे सन २०१८ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. ते ३११ आर्टीलरी रिजिमेंट मध्ये होते. सध्या त्यांचे पोस्टींग लडाख येथे होते. त्याची पत्नी प्रणाली ही सातारा पोलीस दलात दहिवडी पोलीस ठाणे येथे सेवा बजावत आहे. अचानक लडाख येथे काल संध्याकाळी ५ च्या सुमारास १० जवानांसह लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. त्यात जवान वैभव भोईटे यांना वीरमरण आले आहे. कुटुंबाचा एक आधार तुटल्याने भोईटे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार










































