छत्रपती संभाजीनगर, कन्नड ६ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशी येथील जवान सोपान काळे हे हिमाचल प्रदेश मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बर्फ ढासळून झालेल्या अपघातात ते शहीद झाले आहेत. ही माहीती कळताच पळशी गावावर शोक कळा पसरली आहे. सोपान काळे हे भारत तिबेट सीमा पोलीस दलात कर्तव्यावर होते.
२०११ मध्ये निवड होऊन सोपान काळे प्रशिक्षणासाठी उत्तराखंड येथे हजर झाले होते. त्यानंतर ते अरुणाचल प्रदेश मध्ये भारत तिबेट सीमा दलात रुजू झाले असता, ४ ते ५ मार्च दरम्यान बर्फ ढासळल्याने काळेंना वीरमरण आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि अडीच वर्षीय मुलगा तसेच आई वडील असा परिवार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंद कुमार लांडगे