सोमालिया मध्ये दहशतवादी हल्ल्यात ७८ जणांचा मृत्यू

सोमालिया: सोमालिया ची राजधानी मोगडिशू मध्ये अत्यंत गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी मोटारीमध्ये लपवलेल्या वी स्फोटकांचा स्पोर्ट घडून आल्याने मोठ्या प्रमाणावर येथे जीवितहानी झाली आहे. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थी शामिल आहेत.

मोगादेशू मधील तपास नाक्याजवळ हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. तपासासाठी अनेक वाहने थांबलेली असताना स्पोट घडवण्यात आला. तपासासाठी थांबलेल्या वाहनांमध्ये विद्यापीठाकडे जाणारी बसही होती. याचा बस जवळ स्पोर्ट होऊन बसचा चेंदामेंदा झाला आणि इतर अनेक वाहनांचे नुकसान झाले. एकूण ७८ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विदेशी नागरिकही आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सोमालिया मध्ये अल शबाब या दहशतवादी संघटनेने अनेक वेळा मोटार बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत.

सोमालिया मध्ये गेल्या काही वर्षांपासून जनजीवन अत्यंत खालावलेले आहे. तसेच अर्थव्यवस्था ही पुर्ण ढासळलेली आहे. जगातील सर्वात असुरक्षित देशांमध्ये सोमालिया ला गणले जाते. सोमालियाच्या आसपास असलेल्या सागरी भागामध्ये समुद्री लुटारूंच्या समस्याही प्रकर्षाने दिसून येतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा