१७ डिसेंबरच्या काही घडामोडी……

• १७ डिसेंबर रोजी झालेल्या घटना…..

१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिली.

१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.

१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.

२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिंकून ठेवले.

• १७ डिसेंबर रोजी झालेले जन्म…..

१७७८: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८२९)

१८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९०९)

१९००: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)

१९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)

१९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)

१९११: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)

१९२४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)

१९४७: दिग्दर्शक व चलचित्रकार सढदीपक हळदणकर यांचा जन्म.

१९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.

१९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.

• १७ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू……..

१७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचं निधन.

१९०७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन. (जन्म: २६ जून १८२४)

१९२७: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०१)

१९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)

१९३८: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)

१९५६: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९८)

१९५९: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)

१९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०६)

१९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९२४)

२०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.

२०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)

२०१९:मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभेनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा