लोणी काळभोर, दि.१७ मे २०२० : कडमवाकवस्ती येथे दि.१६ मे रोजी रात्री पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती हद्दीती शिक्षक कॉलनीजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्या पावसाने एका मोकळ्या जागेत वीज सदृश घटनेने दोन फूट लांबीचा व जवळजवळ अंदाजे २५ ते ३० खोलीचा खड्डा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली आहे.
विशेष म्हणजे या खड्ड्यात दहा फुटाच्या खाली १५ ते २० खोल पाणी असल्याने याठिकाणी वीज पडली की अजून काय घडले आहे हे स्पष्ट झालेले नाही. शनिवारी संध्याकाळी कदमवाकवस्ती परिसरात ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाट होत जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यावेळी परिसरातील लाईट सुद्धा गेली होती. तीन ते चार तास चालल्या या अवकाळी वादळी पावसाने परिसरातील काही फ्लेक्स, झाडे तुटून पडली. सकाळी या मैदानावर हा खड्डा पाहिल्यावर मात्र वीज पडली या चर्चेने परिसरातील नागरिकांनी खड्डा पाहण्यासाठी गर्दी केली.
या संदर्भात नागरिकांना व तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. ही जागा खासगी असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने जागा मालकाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी भाजपचे कामगार आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्ती चे माजी सरपंच नंदकुमार काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नासीरखान पठाण, व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. व संबधीत घटनेची माहिती काढून या विषयी पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती “न्यूज अनकट” शी बोलताना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व प्रसाशनाने यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे