सोनिया गांधी हाजिर हो….

२१ जुलै, २०२२: कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर आज सोनिया गांधी यांची पहिल्यांदा नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची चौकशी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये तप्त वातावरण आहे. आज महाराष्ट्र ते दिल्ली तसेच संपूर्ण देशात सर्वच ठिकाणी काँग्रेसमध्ये संताप पहायला मिळत आहे. सगळीकडे आक्रोश आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना दिल्लीतून सचिन पायलट यांनी सांगितले, विरोधी पक्षाने सोनिया गांधींना अडकवण्याचा घाट घातला आहे. समाजात दडपशाहीचे वातावरण पसरले जात असल्याचा आरोप सचिन पायलट यांनी विरोधी पक्षावर केला आहे.

यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत आपला विरोध दर्शवला. मोदी आणि शहा यांची जोडी यांच्यामुळे आमच्या नेतृत्वाच्या विरोधात जो राजकीय प्रतिशोध सुरु आहे, यासाठी काँगेस पक्ष सोनिया गांधीच्या कायम बरोबर असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते याआधी पण रस्त्यावर उतरले होते. हे पाहता दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जागोजागी बॅरीकेट्स लावण्यात आले.

ईडी विरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. नाना पटोले यांच्यासह अनेक नेते यांनी ईडी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी ईडीच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकत्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तेथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

सोनिया गांधी जेव्हा ईडी कार्यालयात हजर झाल्या, तेव्हा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी मुंबईत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सोनिया गांधींबरोबर प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधींच्या चौकशीला विरोध केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी या ७० वर्षाच्या असून ईडीने त्यांच्याकडे जाणे अपेक्षित होते. मात्र त्यांना ईडी कार्यालयात बोलावून त्यांचा अपमान केला आहे. यासंदर्भात मी ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना ही बाब दर्शवून देणार आहे. असंही गेहलोत यांनी सांगितलं.

सोनिया गांधीच्या चौकशीवरुन संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधला.
एकुणातच राज्यात सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरुन वातावरण संतापलेलं आहे. आता नक्की ही चौकशी काय वळण घेते आणि देशात काय नवीन घटना घडतात, हे पहावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा