सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, ३ मार्च २०२३: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात आणण्यात आलं, तेथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.

सर गंगाराम हॉस्पिटलने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर छाती औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना २ मार्च म्हणजेच गुरुवारी ताप आल्यानं दाखल करण्यात आलं. त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांच्या अनेक चाचण्या होत असतात. त्यांची प्रकृती स्थिर आहे.”

राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना सोनिया गांधी यांची प्रकृती खालावलीय. ते ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. तिथं ते म्हणाले की भारतीय लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत आहे. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जातायत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. अशा प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले. आम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मीडिया आणि न्यायपालिका ताब्यात: राहुल गांधी

याशिवाय प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असल्याचं राहुल गांधी म्हणाले. दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींवर हल्ले होत आहेत. जो कोणी टीका करतो त्याला धमकावलं जातं. राहुल म्हणाले की, जेव्हा मी काश्मीरला जात होतो, तेव्हा सुरक्षारक्षक माझ्याकडे आले. ते म्हणाले की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. मी काश्मीरमध्ये फिरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ही वाईट कल्पना आहे. माझ्यावर ग्रेनेड फेकले जाऊ शकतात. पण मला माझ्या पक्षाच्या लोकांशी बोलू द्या असं मी त्यांना सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा