सौरव गांगुली २०२४ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष

27

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली सदरील अध्यक्षपदी २०१४ पर्यंत राहणार आहेत.
याबरोबरच बीसीसीआयचे आयसीसीमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या नावावर बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गांगुलींच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा ९ महिन्यांचा असेल, असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता.
परंतु, हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.
दरम्यान, बीसीसीआयच्या बैठकीतील या निर्णयामुळे गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती असेल, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा