‘स्पेसएक्स स्टारलिंकने’ भारताकडे उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी मागितला परवाना

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२२ : उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेसेक्स’ ही स्टारलिंक ब्रँडअंतर्गत या सेवा पुरवते. स्टारलिंकने गेल्या वर्षी भारतात आपली सेवा सुरू करण्याची योजना आखली होती तसेच ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (TRAI) मंजुरी मागितली होती.

स्पेसएक्सने भारतात उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी परवाना मागितला आहे. भारतातील या सेवांसाठी, ‘ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट’ (GMPCS) हा परवाना आवश्यक आहे. हा परवाना/सेवा दूरसंचार विभाग (DoT) द्वारे प्रदान केली जाते.

भारतात GMPCS परवान्यासाठी अर्ज करणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. यापूर्वी एअरटेल सपोर्ट असणारी, ‘वन वेब’ आणि जिओ ची सॅटेलाइट शाखा, ‘जिओ स्पेस टेक्नॉलॉजीने’ यासाठी अर्ज केला आहे. भारताच्या स्पेस इंटरनेट सेगमेंटमध्ये स्टारलिंकचा प्रवेश एअरटेल, जिओ आणि अमेझॉनला तगडी स्पर्धा देईल. एक संस्थेच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत हा बाजार १३ बिलियन डॉलर्सचा असू शकतो.

GMPCS परवान्याशिवाय भारतात उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी इतर अनेक परवानग्याही आवश्यक आहेत. स्टारलिंकला उपग्रह ब्रॉडबँडसाठी सेवा आणि स्पेक्ट्रम प्रदान करण्यासाठी अंतराळ विभागाकडून मान्यता घ्यावी लागेल. तसेच जमिनीवर आधारित उपग्रह गेटवेचीही गरज भासणार असल्याने स्टारलिंकला, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) कडूनही मंजुरी आवश्यक आहे.

स्टारलिंककडे ३४५१ उपग्रह प्रक्षेपणांसह जगातील सर्वात मोठे स्पेस ब्रॉडबँड कॉन्स्टेलेशन आहे. यापैकी २७०० हून अधिक उपग्रह सध्या कार्यरत आहेत. एकूण १२००० उपग्रह प्रक्षेपित करण्याची कंपनीची योजना आहे. उपग्रहांचा हा मोठा संच पृथ्वीच्या कोणत्याही भागातून इंटरनेट कव्हरेज बीम करणे शक्य करतो. उपग्रहांचे नेटवर्क वापरकर्त्यांना उच्च-गती, कमी विलंब इंटरनेट कव्हरेज देते. उपग्रहांद्वारे इंटरनेट तुमच्यापर्यंत असे पोहोचते.

दुसरीकडे, कव्हरेजच्या बाबतीत एअरटेलकडे सर्वात विकसित सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन आहे. आकाश अंबानीच्या नेतृत्वाखालील जिओने, सॅटेलाइट इंटरनेटसाठी जागतिक उपग्रह ब्रॉडबँड प्रदाता SES सोबत हातमिळवणी केली आहे.

स्टारलिंक च्या ब्रॉडबँड किटमध्ये, स्टारलिंक डिश, वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय केबल्स आणि माउंटिंग ट्रायपॉड असतात. हायस्पीड इंटरनेटसाठी डिश खुल्या आकाशाखाली ठेवावी लागते. स्टारलिंकचे अॅप iOS आणि Android वर उपलब्ध आहे.

सॅटेलाइट थ्रू इंटरनेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, भारतातील नियामकाने ते मंजूर करणे आवश्यक आहे. भारतातील दूरसंचार विभागाने स्टारलिंकला आवश्यक परवान्यांसाठी अर्ज करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे जेणेकरून भारतात लवकरात लवकर सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा