स्पिकिंग वॉल म्हणून रंगविले जाणार औंध आयटीआयची भिंत

????????????????????????????????????

औंध: औंध आयटीआयच्या भिंतीवर स्पिकिंग वॉल चे काम आज सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे ७०० फूट लांब असलेल्या या भिंतीवर महाराष्ट्रातील गड किल्ले व निसर्गाच्या विविध छटा असलेले चित्र काढून परीहार चौक ते सिंध सोसायटी पर्यंत ७०० फूट लांब असलेल्या आयटीआयच्या भिंतीवर स्पिकिंग वॉल म्हणून रंगविले जाणार आहे. औंध व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून या भिंतीवर विविध चित्रे रेखाटून आयटीआय ची ही भिंत स्मार्ट आयटीआय रोडला शोभेल अशाप्रकारे चित्रे काढून सुशोभित करणार आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशाप्रकारे येथे चित्रे काढले जाणार आहेत. नागरिकांच्या सहभागातून हे काम केले जाणार असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले चित्रकलेतील येथे पणाला लावून आपल्या परिसराचे वैभव वाढवण्यासाठी आपला सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सकाळी आठ वाजता आयटीआय च्या भिंतीवर चित्र काढण्यास सर्वात होणार आहे. तुम्ही चित्रकार असणे आवश्यक नाही चित्रकारांनी काढलेल्या चित्रांमध्ये तुम्ही रंग भरण्याचे काम सुद्धा करू शकता किंवा हलकेफुलके चित्र सुद्धा काढू शकता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा