सत्ताधाऱ्यांना खास दिवाळी ऑफर.

पुणे १७ ऑक्टोबर २०२० : १४ तारखेच्या रात्री मुसळधार पावसाने पुन्हा एकदा आंबील ओढया लागत राहणाऱ्या घरांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले. अनेक लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी , चिखल, गाळ साठून लोकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

याचाच संताप व्यक्त करत, ह्या परिसरात राहणारा सामाजिक कार्यकर्ता संदीप काळे यांनी एक बॅनर आंबील ओढा लगतचा परिसरामध्ये लावलेला दिसत आहे.

ह्या बॅनर मधून संदीप काळे यांनी खास दिवाळी ऑफर सांगत पुण्याचे महापौर, उपमहापोर , स्थानिक नगरसेवक यांना जाहीर आवाहन केले आहे. यांनी एक दिवस ओढयालगत असणाऱ्या कोणत्याही घरा मध्ये रहा आणि येथील स्थानिक लोकांकडून लाखोंची बक्षिसे कमवा असे म्हंटले आहे. पावसाळ्याचा ऋतु संपेपर्यंत ही ऑफर मर्यादित असणार आहे .

दांडेकर पूल, सिंहगड रोड , नीलायम चौक , आंबील ओढा वस्ती अशा जवळपासच्या ठिकाणी हे दिवाळी ऑफरचे पोस्टर लावले आहेत

या संदर्भात संदीप काळे यांच्याशी न्युज अनकटच्या प्रतिनिधीने बातचीत केली असता ते म्हणाले, गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी आंबील ओढ्याला पूर आला होता त्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले. घर लोकांची पुरामध्ये मोडकळीस आली होती. ह्या वर्षी जून महिन्यात आयुक्तांना पत्र देऊन गेल्या वर्षी आलेल्या पुरामध्ये पडलेली भिंतीचे बांधकाम पूर्ण करा , नाले , गटारे साफ करून घ्या, जेणेकरून पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. परंतु ही कामे तर काही पूर्ण झाली नाहीच, ह्या वर्षी १४ तारखेला परत पूर आल्यानंतर कोणी ही शासन अधिकारी असेल , स्थानिक नगरसेवक असतील , कोणीही साधी काय परिस्थिती झाली आहे त्याची पाहणी देखील केली नाही. लोकांच्या घरांचे पंचनामे ही केले नाहीत. १४ तारखेच्या रात्री लोकांना कोणत्याही प्रकारच्या सूचना महानगरपालिके कडून दिल्या गेल्या नव्हत्या, ना ही कोणत्या प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनची सोय ही उपलब्ध केली नाही, त्यामुळे आम्ही हे खास ऑफर चे पोस्टर लावले आहे.

अजुन पर्यंत तरी कोणी ह्या ऑफर साठी इच्छुकता दर्शवली नसल्याचे त्यांनी ह्या वेळी त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा