लोणी काळभोर: दि. ०२ जानेवारी २०२१ : भिमा-कोरेगाव येथील विजय स्थंभाला दरवर्षी १ जानेवारीला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात.
परंतु या वर्षी संपुर्ण जगावर व देशावर कोरोना महामारीचे संकट असताना प्रतिकात्मक अभिवादन करावे असे आवाहण समाजातील नेत्यांनी व प्रशासनाने केलेले होते.
व प्रमुख व्यक्तींसाठी पासेस उपलब्ध करुन देण्यात आले होते, व आंबेडकरी अनुयायांचा उत्साह व कोरोना साथीचा वाढता धोका अशा गंभिर परीस्थीतीमध्ये पोलीस प्रशासनाने अतिशय संयमाने परिस्थीती हाताळली, व कोणतेही गालबोट न लागु देता हा शौर्यदिन यशस्वीरित्या पार पडला. या उत्सवाचा सुरक्षा रक्षण, वाहतुकीचा भार लोणी काळभोर पोलीस स्टेशन व लोणी कंद पोलीस स्टेशन वर अधिक असतो. या दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणुन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुतीदादा कांबळे, व सामाजिक कार्यकर्त्य श्रीनिवास वाघ, यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचा विशेष सत्कार केला.या प्रसंगी प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे