बुद्ध पौर्णिमा विशेष

बुद्ध पौर्णिमा विशेष..
माझ्या धम्माचा ईश्वर,आत्मा, कर्मकांड, व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही, माणूस व माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दुःख ,दैन्य, दारिद्र्य व दारिद्र्यात रहत आहेत. है.सर्व जग दुःखाने भरलेले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

अशी शिकवण देणार्‍या गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे इ.स.पू. ५६३ मध्ये झाला. वडील शुद्धहोधन हे शाक्य गणराज्याचे राजे होते. आई महामायेचे राजकुमाराच्या जन्मानंतर अल्पावधीतच निधन झाल्याने त्याची सावत्र आई व मावशी महाप्रजापती गौतमी यांनी राजकुमारचा सांभाळ केला. त्याचे नामकरण सिद्धार्थ असे केला. राजकुमारांना त्यांच्या सावत्र आईच्या नावावरून गौतम हे नाव पडले, राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचा विवाह राजकुमारी यशोधरा यांच्याशी झाला, त्यांना पुत्रप्राप्ती ही झाली त्याचे नामकरण “राहुल” असे करण्यात आले. संसारात राजकुमार हे रममाण होते त्यांना त्यावेळी दुःख, दारिद्र्य यांची पुसटशीही कल्पना नव्हती.

एके दिवशी राजकुमार नगरातून फेरफटका मारत असताना त्यांना दुःख, दारिद्र्य, अंतयात्रा या गोष्टी जवळून पाहण्याचा योग आला. हे पाहिल्यानंतर राजकुमारचे मन दु;खी झाले त्याच वेळी संसारिक व राजघराण्याच्या आयुष्याचा त्याग करण्याचा निर्णय घेऊन वयाच्या २९ व्या वर्षी एका पावसाळी रात्री निघून गेले.

सिद्धार्थ गौतमांनी प्रथम राजगृह येथे जीवनक्रम चालू केला, ज्ञानाच्या शोधात असताना त्यांनी दोन गुरुंचे शिष्यत्व पत्करले पण आत्मोध्दारा पेक्षा स्वजनांचे उद्धाराचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धार्थाने दोघांनाही नकार दिला. त्यानंतर त्यांनी बिहार राज्यातील गया येथील निरंजन नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना 49 दिवसांच्या अखंड तपस्येनंतर वयाच्या ३५ इ.स.पु ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या च्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण म्हणतात, ज्ञान प्राप्ती नंतर गौतम सिद्धार्थ यांना बुद्ध म्हणू लागले, बुद्ध हे नाव नसून आकाशा इतका विद्वान असा होतो. ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षास “बोधी वृक्ष”वृक्ष म्हणू लागले.

भगवान बुद्धांनी “पाली” या भाषेतून बौद्ध धर्माची शिकवण दिली. समता,शांती, बंधुभाव, प्रज्ञा, शील करुणा यांचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज २५६४ वी जयंती निम्मित त्यांना विनम्र अभिवादन.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा