कोरोना योद्धयांना तिन्ही दलांकडून विशेष सलामी

नवी दिल्ली, दि.३ मे २०२० : कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या कोरोना योद्धयांना पायदळ, हवाई दल आणि नौसेना या तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आज (रविवारी) विशेष मानवंदना देण्यात आली.
डॉक्टर, नर्सेस, रुग्णालय कर्मचारी, पोलीस, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोना विरोधात लढत आहेत.

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्ड वाजवून करून कोरोना योद्धयांना सलामी देण्यात आली. भारतीय वायू सेनेतर्फे फ्लायपास्टचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात आले. यामध्ये भारताची अत्याधुनिक लढाऊ विमाने व वाहतूक विमानांचा समावेश आहे.

याशिवाय भारतीय नौदलांकडून या योद्धयांना समुद्रातूनही सलामी देण्यात येणार आहे. यावेळी २४ बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे.

गुजरातच्या पोरबंदर, मुंबई, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकता येथील बंदरावर आज संध्याकाळी सात वाजता आकर्षक रोषणाई करण्यात येणार असून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा