नवीन सीबीआय प्रमुख निवडीच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली, १३ मे २०२३: केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या नवीन संचालकांच्या निवडीसाठी स्थापित उच्चस्तरीय समितीची बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. संभावित संचालक पदासाठीच्या नावावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जायस्वाल यांचा कार्यकाळ वाढला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या दोन वर्षांचा कार्यशाळा २५ मे रोजी समाप्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोडा यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांच्या नावावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र कॅडरचे १९८५ बँचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त जायस्वाल यांना २६ मे २०२१ रोजी सीबीआय प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. सीबीआय तसेच ईडी संचालकांचा कार्यकाळाला पाच वर्षांपर्यंत सेवा विस्तार देण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत सरकारने कायदा पारित केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा