“एसपीजी” चे आभार – सोनिया गांधीं

नवी दिल्ली : गांधी कुटुंबाचे गेली २८ वर्षे समर्पणपूर्वक संरक्षण करणाऱ्या विशेष संरक्षण समूहा (एसपीजी)बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या बद्दल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आभार मानले. कुटुंबाची “एसपीजी’ सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्यांनी एसपीजीचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना “एसपीजी’ सुरक्षा होती.

आता सीआरपीएफकडून “झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. जेव्हापासून आमची सुरक्षा “एसपीजी’च्या हाती होती, तेव्हापासून मी आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षेची हमी होती. गेल्या २८ वर्षांपासून दररोज न चुकता त्याचा आम्ही अनुभव घेतला.
उच्च व्यावसायिकता, कर्तव्याचे समर्पण आणि प्रामाणिकपणाद्वारे “एसपीजी’ने आमचे संरक्षण केले. ती एक उत्कृष्ट शक्ती आहे आणि त्यांच्या सदस्यांनी प्रत्येक कामात धैर्य व देशप्रेमाची भावना निर्माण केली आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने “एसपीजी’चे आभार मानते, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

राहुल गांधींनीही यापूर्वी “एसपीजी’चे आभार मानले होते. दरम्यान, सखोल सुरक्षा मूल्यांकनानंतर गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा मागे घेण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा