इंदापूर मध्ये पदवीधर, शिक्षक मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद….

इंदापूर, १ डिसेंबर २०२०: संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इंदापूर शहरातील मतदान केंद्रांवर पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पहावयास मिळत आहे.

पदवीधर विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार आणि पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक अगदी चुरशीची होत आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेऊन ही निवडणूक अधिकच चुरशीची केली आहे.

इंदापूर शहरातील मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित पक्षांचे बुथ अगदी गजबजून गेले आहेत.
शिक्षक आणि पदवीधरांना आपले मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वयंसेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.

जरी ही निवडणूक पदवीधर आणि शिक्षक विभागाची असली तरी इंदापूर तालुक्या मुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक प्रचारात पहिल्यापासून आघाडी घेतली होती. माजी मंत्री पाटील यांनीदेखील तितकीच मेहनत घेतली होती.
त्यामुळे शांततेत पार पडत असलेले मतदान आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मतदार नेमका कोणाला बहुमत देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा