नांदेड, २१ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने जागृती करण्याकरिता महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणावरून शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर पेन्शन संकल्प यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत २८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या विधान भवनावर धडकणार आहे. ही संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज सकाळी अकरा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी ज्यामध्ये शिक्षक आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक कृषी विभाग महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘जो पेन्शन की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गौतम कांबळे