जम्मू काश्मीरमध्ये पकडले गुप्तहेर कबुतर

नवी दिल्ली, दि.२६ मे २०२०: जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान दिवसेंदिवस कुरघोडी करताना दिसत आहे. त्यात सीमा उल्लंघन, सैनिकी हल्ले, दशतवादी हल्ले अशा अनेक प्रकारचे उद्योग करत असतो. आता त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील असलेल्या कठुआ जिल्ह्यात नागरिकांनी एक पाकिस्तानी ‘गुप्तहेर कबूतर’ पकडले आहे.

या कबूतराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पायात चक्क अंगठी आढळून आली असून या अंगठीवर एक क्रमांक लिहिण्यात आला होता. नागरिकांनी या कबूतराला ताब्यात घेऊन गुप्तचर यंत्रणेच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सोमवारी( दि.२५) रोजी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेले हे ‘कोडेड मेसेज’ असलेले कबूतर हिरामगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेत सुरक्षा यंत्रणेच्या स्वाधीन केले आहे.

त्या कबुतराच्या पायात अंगठी असून त्यावर उर्दू भाषेत एक संदेश लिहिलेला आहे.आणि याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत अशी माहिती कठुआचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.

दोन महिन्यांपूर्वी ही बिकानेर भागात असेच कोड असलेलं कबुतर पकडण्यात आले होते. त्याच्या पाययातही अंगठी आणि उर्दू भाषेत संदेश लिहिलेला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांनतर भारतात लॉक डाऊन सुरू झाला.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा