नाशिक, १९ ऑगस्ट २०२३ : कर्नाटक राज्यातील बागलकोटमध्ये महापुरुषांचा पुतळा हटविल्या प्रकरणाचे पडसाद नाशिकमध्ये उमडले असून, श्रमिक सेनेने कॅनडा कॉर्नर वरील कर्नाटका बँकेवर शाई फेक करुन या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
श्रमिक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील कॅनडा कॉर्नरवरील कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्रे लावून कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे. तसेच कर्नाटक बँकेच्या नामफलकावर शाई फेक करुन काळे फासण्यात आले. कर्नाटक सरकारचा धिक्कार असो. अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख मामा राजवाडे, श्रमिक हॉकर्स सेनेचे कार्याध्यक्ष संदिप जाधव, भीषण कासार, संतोष साळुंखे, शहराध्यक्ष सागर दाते, महेंद्र शर्मा, मनोज सोनार, चंदू इंगळे आदिंसह श्रमिक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर