श्रीलंका की पाकिस्तान? कोण ठरणार आशिया कप २०२२ विजेता?

57

दुबई ,११, सप्टेंबर २०२२ : आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना आज रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका  हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना आज
दुबई इंटननॅशनल स्टेडियममध्ये रंगणार असून याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली होती. एकीकडे श्रीलंकेला अफगाणिस्तानने तर पाकिस्तानला भारताने मात दिली होती. पण नंतर उर्वरीत सामन्यात दोघांनी कमाल खेळत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने श्रीलंकाविरुद्धच्या मागील सामन्यात शादाब खान आणि नसीम शाह या धाकड गोलंदाजांना विश्रांती देत हसन अली आणि उस्मान कादिर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले होते. परंतु आता अंतिम सामन्यात आझम या दोन्ही खेळाडूंना पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकतो. नसीम शाह आणि शादाब खान यांचे आशिया चषकातील आतापर्यंतचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. शादाबने ४ सामन्यात ७ तर नसीमने ४ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दुखापतीतून बरा झालेल्या शाहनवाज दहानी यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्याचा विचार आझम करू शकतो.

दुसरीकडे श्रीलंका संघाचाल विचार करता आशिया चषक २०२२ मध्ये, श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी आतापर्यंत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. तसंच कर्णधार दासुन शनाकाने डेथ ओव्हर्समध्ये शानदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ कोणताही बदल न करता जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

कधी आहे सामना?

आज अर्थात ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव