भारतासमोर आज श्रीलंकेचे आव्हान

31

पुणे,६ सप्टेंबर २०२२ : आशिया चषक २०२२ अंतिम चरणात आहे. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता आशिया चषकातील सुपर-४ सामने सुरू आहेत. यातील तिसरा सामना आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात रंगणार आहे.

सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंकाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. हा सामना गमावल्यास भारताला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागेल.

भारतीय संघाला जर श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर त्यांनी एकच गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे त्यांनी संघातील प्रयोग थांबवायला हवेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने बरेच प्रयोग केले होते आणि त्याचा फटका त्यांना बसला. या सामन्यात दिनेश कार्तिकला संघातून बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संघ पाच गोलंदाज घेऊन या सामन्यात उतरला खरा, पण यामध्ये त्यांनी तीन फिरकीपटूंचा समावेश केला. हे प्रयोग भारतीय संघ अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर रिषभ पंतला संधी दिली आणि दिनेश कार्तिकला संधी दिली. पंत या सामन्यात अपयशी ठरला आणि त्याचा फटका भारताला बसला.त्यामुळे आता जर भारताने पुन्हा असे प्रयोग केले तर त्यांना पराभवाचा दुसरा धक्का बसू शकतो आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागेल. त्यामुळे भारताने फक्त प्रयोग कमी केले, तर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय साकारू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा