जालना, २६ डिसेंबर २०२३ : जालन्यात दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल तसेच स्थानिक पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पथसंचलन करत शक्तिप्रदर्शन केले. जिल्ह्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून मराठा बांधव आणि ओबीसी बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषणे करीत आहेत, या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने जालन्यात आज पोलिसांनी रूट मार्च काढला.
या पथसंचलनात राज्य राखीव पोलीस दलाचे १२० कर्मचारी तसेच जालन्यातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस सहभागी झाले होते. सर्व नागरिकांनी शांतता, एकोपा आणि सामंजस्य राखून आंदोलने, सण-उत्सव शांततेत पार पाडत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी