पुणे, २७ जुलै २०२३ : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत देशभरातील विविध शहरांत स्टार एअरलाईन्सतर्फे १५ विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे. सद्यस्थितीत आमच्या १८ विमानसेवा सुरू आहेत. यातील १५ मार्ग हे उड्डाण योजनेअंतर्गत तर ०३ नॉर्मल मार्ग आहेत, अशी माहिती संजय घोडावत समूहाचे प्रमुख संजय घोडावत यांनी दिली.
स्टार एअरलाईन्सकडून नुकतीच पुणे-बंगळुरु व्हाया हैदराबाद अशा विमानसेवेला सुरुवात झाली. त्याची माहिती देण्यासाठी पुणे विमानतळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संजय घोडावत बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर शहरातून आम्ही विमानसेवेला सुरुवात केली, येथून सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कंपनीकडे सध्या सात विमाने आहेत. आणखी दोन नवीन विमाने येणार आहेत. सध्या स्टार एअरलाईन्सचे मुख्यालय बंगळूरु येथे असुन ते पुण्यात स्थलांतरित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात पुण्यातून इंदौर आणि जोधपूर येथे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत आणखी काही शहरासाठी विमानसेवा सुरू करत असल्याचेही घोडावत यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर