स्टार किड्स आणि त्यांचे ड्रग्ज कनेक्शन- सुईत धागा की धाग्यात सुई

मुंबई, 4 ऑक्टोंबर 2021:स्टार आणि ड्रग्ज हेच वास्तव होतं. त्यात संजय दत्त, महेश मांजरेकर यांची नावं जोडली होती. पण त्यानंतरचे पाऊल होते स्टार किडस्. अर्थात प्रसिद्ध अभिनेत्यांची मुले. सध्या नुकतचं चर्चेत असलेलं नाव म्हणजे किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. मुंबईतून गोव्याकडे जाणा-या एका अलिशान क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. त्यात समोर आली अनेक मोठी नावं, ज्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, आणि अरबाज मर्चंट. अचानक या छाप्यामुळे अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांच्यातले ड्रग्जसंदर्भातले धागेदोरे समोर आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टी वादाच्या भोव-यात सापडली आहे.

या प्रकरणात आर्यन खानबरोबर अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांनादेखील अटक करण्यात आली आहे. सध्या अरबाद मर्चंट हे नाव ड्रग्ज पार्टीत नियमित चर्चेत आहे. त्यानेच आर्यन खानला पार्टीत आणलं अशी माहिती एनसीबीकडून मिळाली आहे. एनसीबीने तब्बल आठ लोकांना ताब्यात घेतलं. यात दोन महिलांचादेखील समावेश आहे. असं सांगितलं जात आहे की शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही देखील अरबाजच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असून ती अरबाजला फॉलो करत आहे. त्यामुळे हे ड्रग्ज कनेक्शन नक्की कुठेपर्यंत आहे, याचा शोध एनसीबी घेत आहे. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याचे चॅट तपासले जात आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. अजूनपर्यंत कोणी आर्यन खानचं थेट नाव घेत नसून अरबाजच्या सांगण्यावरुन आर्यन खान पाहुणा म्हणून क्रुझवर गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी एनसीबीने आपले २२ अधिकारी क्रूझवर पाहुणे म्हणून तैनात केले होते. जे आधीपासूनच तिथे हजर होते. एनसीबीने क्रूझमधल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर सात तास तपासणी सुरु होती. एनसीबीचे विभागीय संचाल समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून पुन्हा एकदा हे पथक क्रूझवर पोहोचले आहे. सांगण्यात येत आहे की आर्यनच्या पायात घातलेल्या मोज्यात त्याने ड्रग्ज लपवले होते आणि ते त्याने स्वत: साठी आणले होते. नवी मुंबईतल्या बेलापूरमधल्या माणसाकडून त्याने ड्रग्ज मागवले होते. आता सगळ्यांना एकमेकांसमोर सगळ्यांना समोर उभे करुन जर त्यांच्याकडून गुन्हा कबूल झाला तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. अन्यथा कायद्यानुसार त्यांना काही दंड भरुन सोडून देण्याची शक्यता आहे. यावेळी क्रूझचे संचालक जर्गन बेलम यांनी सांगितले की आम्ही फक्त जहाज दिले होते. ड्ग्जच्या बाबतीत आम्हांला काही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या आर्य खान, अरबाज मर्चट, मुनमुन धमेचा यांना जे.जे. रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी घेऊन गेले असून त्यातून काय निष्पन्न होतं, पहावं लागले. सुशांत सिंह च्या आत्महत्या की मर्डर या प्रकरणातही ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे आता सिनेसृष्टी आणि ड्रग्जचे धागेदोरे कुठपर्यंत ओवले गेले आहे, आणि ही माळ नक्की कुठपर्यंत पोहोचली आहे, हे शोधणं एनसीबीसाठी चँलेंज ठरणार आहे, हे मात्र नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस, मुंबई

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा