पुणे, सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्र सुरू करा: माने

इंदापूर, दि.१४,मे २०२०: केंद्र शासनाकडून राज्य शासनाला आधारभूत दरात मका व ज्वारी (हायब्रीड) खरेदी करण्यासाठी ८ मे २०२० रोजी परवानगी दिली आहे. प्रामुख्याने पुणे व सोलापूर जिल्हातील बाजार समित्यांची असलेली हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी त्वरित पूर्ण करून मका व ज्वारी खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू करावेत.अशी मागणी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती व मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केली आहे.

यावेळी आ. यशवंत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाकडून राज्य शासनाला आधारभूत दरात मका व ज्वारी (हायब्रीड) खरेदी करण्यासाठी ८ मे २०२० रोजी परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यात २५ हजार मेट्रिक टन मका व १५ हजार मेट्रिक टन ज्वारी खरेदी धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. सद्यस्थिती खरीप हंगामातील मका हे पिक लष्कर आळीने व समारोपाच्या संततधार पावसामुळे मका उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हि निघालेला नाही. तरी देखील शेतकऱ्यांनी दुबार मक्याचे पिक घेतले असून सध्या त्याचे उत्पादन सुरू झाले आहे.

परंतु प्रत्यक्षात मका दर हा प्रति क्विंटल रुपये १३०० ते १३३१ बाजारभाव मिळत आहे. पोल्ट्री व्यवसायला सुद्धा मागणी अभावी मका दरात मोठी घट झाली आहे. सध्या मका हमी भाव रुपये १७६०प्रति क्विंटल आहे. त्या दरात मका खरेदी (हमी भावात) करण्याचे शासन धोरण आहे.शिवाय बाजार समित्यांची हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत जिल्हा अधिकारी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी त्वरित हमी भाव खरेदी केंद्र सुरू करून मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय व आर्थिक आधार देण्याच्या धोरणाची त्वरित अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.

अशी मागणी आ.यशवंत माने यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी घेतलेले डाळिंब, द्राक्ष,कांदा, केळी, पेरू वैगरे अन्य पिकांवर अवकाळी पावसाचे व सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच भरडधान्य खरेदीने शेतकरी वर्ग येणाऱ्या आर्थिक संकटातून सावरले म्हणून हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत अशी मागणी माने यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा