२६ फेब्रुवारीच्या आधी पुरंदर उपसा योजना सुरु करा : राहुल नार्वेकर

पुरंदर, २३ फेब्रुवारी २०२४ : पुरंदर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून यामध्ये पुरंदर उपसा, चारा डेपो, टॅंकरने पाणीपुरवठा यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना निवेदन दिले. यावेळी पुरंदर उपसा योजना २६ तारखेच्या आधी कार्यान्वित करावी व तात्काळ अहवाल शासनाला पाठवा. अशा सूचना भ्रमणध्वनीद्वारे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर यांना देण्यात आल्या.

सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांकडून सासवड, जेजुरी, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, त्याचबरोबर तालुक्यातील इतर घडामोडींवर आढावा घेतला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न निर्माण झाला तर गय केली जाणार नाही. त्यामुळे या योजना तात्काळ सुरू करा व अहवाल तात्काळ कार्यालयाकडे पाठवा.

यावेळी पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दुष्काळासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी लेखी निवेदन विधानसभेच्या अध्यक्षांना दिले. तर पुरंदर उपसा सिंचन योजनेचे कर्मचारी निलेश लगड यांची तात्काळ बदली करण्याची मागणी शिवसेनेचे शिंदे गटाचे युवा तालुकाप्रमुख नितीन कुंजीर यांनी केली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, निमंत्रक एड. श्रीकांत ताम्हाणे, सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, किसान सेलचे अध्यक्ष संदीप देवकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा तालुकाप्रमुख नितीन कुंजीर, माजी नगरसेवक सचिन भोंगळे, साकेत जगताप, अमोल जगताप, दीपक जावळे, समीर भिसे, अथर्व भोंगळे, आनिल भोगळे, अमोल यादव उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा